विजपोल कोसळल्याने सोयगाव शहरात तेरा तास वीजपुरवठा ठप्प , विद्युत पोल रोवण्याच्या चौकशीची नागरिकांमधून मागणी ---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२५-- सोयगाव शहरासह परिसरात बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने काही ठिकाणी वीजपोल गाव पुरवठ्याचे रोहित्र कोसळल्या मुळे गुरुवारी सोयगाव शहरासह,आमखेडा,गलवाडा आदी भागातील वीजपुरवठा तब्बल तेरा तासांपेक्षा अधिक वेळ खंडित झाला होता. 

त्यामुळे शहरातील शासकीय कार्यालये विजेच्या अभावी ठप्प झाले होते. ग्रामीण भागातील नागरिकांचे कामे झाली नव्हती दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण च्या वीज मंडळाने सकाळी आठ वाजेपासून मोहीम हाती घेतली होती परंतु सायंकाळी सहा वाजेपर्यंतही शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता त्यामुळे शहरातील नागरिकांची चांगली च गैरसोय झाली होती. दरम्यान ठेकेदाराने विद्युत पोल नियमाप्रमाणे जमिनीत रोवले नसून विद्युत पोल रोवताना निकृष्ट दर्जाचे काम केले आहे.यामुळे वीज पोल कोसळून जीवित होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे.या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments