शिर्डी येथे मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न!




शिर्डी( प्रतिनिधी)-शिर्डी येथील
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था आणि श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई (जयपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचा उद्घाटन समारंभ नुकताच श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम ), शिर्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या शिबिराचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष शिवाजी कचरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे नारायण व्यास, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, वैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ मैथिली पितांबरे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री कचरे यांनी बोलताना, हे शिबिर दि. २५ जून ते २७ जून २०२६ दरम्यान श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी येथे आयोजित करण्यात येणार असून श्रवणदोष असलेल्या नागरिकांच्या जीवनात या शिबिरामुळे सकारात्मक बदल घडून येणार असल्याने जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. 
शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली श्रवण तपासणी करून पात्र लाभार्थींना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments