एकल महिला दिन नगरपरिषद शिर्डी येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष शिर्डी नगरपरिषद शिर्डी
मा.सौ. सुनीताताई गोंदकर सभापती महिला व बालकल्याण समिती सौ.प्रतीक्षा किरण कोते
गटनेता शिर्डी न. प.यांचे अध्यक्षतेखाली आणि
श्री.प्रकाश जोंधळे तालुका समन्वयक
(साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य),श्री. मिलिंदकुमार साळवे (ज्येष्ठ पत्रकार व राज्य संपर्कप्रमुख साऊ एकल महिला समिती),डॉ.श्री. संजयजी उबाळे,(सल्लागार,साऊ एकल महिला समिती),सोनालीताई कालेकर, किर्तीताई दिघे,ॲड.सौ.निशा धनवटे आणि श्री.सुरेश नळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्री.मिलिंदकुमार साळवे यांनी एकल महिलांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि त्यांच्याच विचारधारेवर एकल महिलांना सन्मान आणि स्वयंरोजगार यासाठी महाराष्ट्र राज्यात काम करत असलेली साऊ एकल महिला समितीचे प्रेरणादायी काम याबाबत मनोगत व्यक्त केले. तालुका समन्वयक श्री.प्रकाश जोंधळे यांनी एकल महिलांच्या समस्या आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यांनी एकल महिलांसाठी सर्वतोपरी योजनांचा लाभ मिळण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी नगरपंचायतमार्फत उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. तसेच मुख्याधिकारी श्री.सतीश दिघे यांनी शिर्डीत मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून यापुढे एकल महिलांसाठी नगर परिषदेमार्फत विविध योजना राबवल्या जाणार असल्याची माहिती दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष मा.श्री. अभय शेळके पाटील,
सौ. कोमल ताई बोराडे (सभापती पाणीपुरवठा)
वैशालीताई कोते तसेच शिर्डी नगरपंचायत नगरसेविका सौ.छायाताई पोपट शिंदे ,सौ.छायाताई सुधीर शिंदे ,सौ.विद्याताई शेजवळ ,सौ.सरिताताई सोनवणे ,सौ. अलकाताई गोतीस ,श्री.दिपक गोंदकर (सभापती आरोग्य समिती शिर्डी न. प.), तसेच नगरसेवक श्री.नितीन पारजी कोते,श्री.सतिश गोंदकर
मुख्याधिकारी श्री.सतिश दिघे साहेब यांचे सह बहुसंख्य एकल महिला भगिनी उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन श्री स्वानंद रासने यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. वैशालीताई कोते यांनी केले.
0 Comments