पर्यावरण रक्षण ही केवळ घोषणा नसून ती लोक चळवळ व्हावी या उद्देशाने काम करावे - पद्मभूषण अण्णा हजारे .



 विजय बोडखे (राजुरी वार्ताहर )

पर्यावरण रक्षण ही केवळ घोषणा नसून ती लोक चळवळ व्हावी,या उद्देशाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या सदस्यांनी काम करावे असे परखड मत पद्मभूषण डॉ अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. राळेगणसिद्धीत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन आणि वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ विचारांचे मंथनच झाले नाही, तर पर्यावरण रक्षणासाठी एका मोठ्या संघटित शक्तीचा उदय झाला आहे.

कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी उपस्थित पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पुढाकार घेणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी आपल्या प्रबोधनातून अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला.
    कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सकारात्मक पद्धतीने झाली. सौ. निर्मला म्हस्के यांनी स्वतःहून बहावा वृक्ष बियांचे वाटप करून एक निसर्गस्नेही संदेश दिला, तर यवतमाळच्या वैशाली राठोड यांनी कापडी पिशव्यांचे वाटप करत प्लास्टिकमुक्तीचा वस्तुनिष्ठ संदेश दिला. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण दिनाचे औचित्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागले.
यावेळी सेवापूर्ती सन्मानामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. अनिल किसन लोखंडे आणि राजेंद्र कांबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. सोबतच राज्यभरातून आलेल्या नदी संवर्धन, वृक्षारोपण आणि प्राणीमित्र म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पर्यावरण प्रेमींचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद अहिल्यानगरच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी भूषवले. व्यासपीठावर माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड मॅडम, अति विशेष सरकारी वकील ऍड. सुरेश लगड आणि सेवानिवृत्त वनरक्षक प्रभाकर म्हस्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी केले. यावेळी राज्यस्तरीय कोअर कमिटीने नियुक्त केलेल्या नूतन जिल्हाध्यक्षांना व राज्य कार्यकारीणी पदाधिकारी नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. छायाताई राजपूत यांनी कोअर कमिटीचा विशेष सन्मान केला. तसेच, प्रमोद मोरे आणि मीनाक्षी मोरे कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले, तर आभार महेश पाडेकर (कार्याध्यक्ष) यांनी मानले.
 , मंडळाचे सचिव वनश्री मोरे-गुणवरे, नानासाहेब गोफने, बाळासाहेब डोंगरे, चंद्रकांत भोजने, सुहास गावित, मदन राजपूत, प्रकाश केदारी, लतिका पवार आणि तुकाराम अडसूळ,भारती शेवते,गिताताई गिल्डा,स्वाती आहिरे,अलकाताई गव्हाणे,अनघा नांदापूरकर, सतिश नेहे,प्रा दादासाहेब जवरे, सोपानराव वायाळ, राजकुमार गिरी, संजय गायकवाड, वैभव मोरे, प्रा भारत उगाडे, सुर्यकांत बोईनवाड, शालिनी आंबरे,पत्रकार विजय बोडखे, विठ्ठल शिंदे, नामदेव जगदाळे ,अर्जुन राऊत,यांच्यासह निसर्ग पर्यावरण मंडळाचे सर्व सदस्य अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याने राज्यातील पर्यावरण प्रेमींना एका सूत्रात बांधले आहे. या कार्यशाळेतून सुरू झालेली ही हरित चळवळ निश्चितच भविष्यात व्यापक स्वरूप घेईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments