ट्री फॉर बी' उपक्रम - बेलाचे रोपण व आवाहन कृषी व्यवस्थेस पूरक, मधमाशा, पक्षी, फुलपाखरं यांना उपयुक्त ---

 


दिलीप शिंदे
सोयगाव दि.२१-- पर्यावरण, आरोग्य, संस्कृती, अध्यात्म यात अत्यंत महत्वाचा असलेला व भगवान शंकरास प्रिय असलेल्या अनेक बेल रोपांचे रोपण जैवविविधता दिनाच्या पूर्व संध्येला सिल्लोडचे पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हरितवारी या उपक्रमातुन पर्यावरण गाव बहुली, अन्वी, देऊळगाव ( क. )येथील शेतकऱ्यांच्या शेतात, महादेव मंदिर परिसरात भाऊ साहेब निकोत, रवींद्र तुपे, सतिष निकोत, शरद पवार, अशोक पिसाळ ई. च्या उपस्थितीत केले. महादेवास बेल प्रिय आहे.त्रिशूल हे बेल पत्राचे स्वरूप आहे. त्याचा तीन पत्र आकार त्रिशूला समान दिसतो .भगवान ब्रम्हा, विष्णू व महेश या त्रिदेवास ही तीन पाने प्रिय आहे. आयुर्वेदात ही वात, पित्त, कफ या त्रीदोषावर बेल उपयुक्त आहे.वातावरणातील सल्फर डाय ऑक्सईड सारखी प्रदूषके हवेतून शोषून त्यांना उदासीन करणारा हा वृक्ष धुळीचे कण देखील अडवतो म्हणून यास "क्लायमेट प्युरी फायर 'ही म्हणतात. 

    ------------------------------------------------------------ - - महाऔषधी गुणधर्म - बेलात ५ जीवनसत्व , प्रथिन, शर्करा, तांबे हा महत्वाचा धातू व ४ प्रकारचे क्षार असून मूळव्याध, हृदय रोग, बद्ध कोष्टता, श्वास विकार, ई. वर उपयुक्त असून दशमूळाचा घटक आहे.
 --------------------------------------------------------    
     -- शेतीस उपकारक - बेल पानांपासून निर्मित कीटक नाशक भात पिकावर पडणाऱ्या ब्राऊन प्लॅन्ट हुपर या किडीवर प्रभावी आहे. बेल पत्रा पासुन निर्मित ईजेंशियल ऑइल हे मधमाशांना आकर्षित करते. ते उन्हाळ्यात कांदा, टरबूज ई पिकांवर उघडे करून ठेवल्यास मधमाशा आकर्षित करते. या पिकांच्या परागी भवन व फल धारणेस मदत यामुळे मदत होते. बेल वृक्ष शेतात असेल तर अशाच रीतीने मधमाशा या मंद सुवासिक फुलांकडे आकृष्ठ होतात.या फळात पोटॅशियम विपुल असून पिकून खाली पडलेली फळं शेतात टाकली तर जमिनीस पोटॅश मिळते जे पीक वाढीसाठी उपयोगी ठरते. 
---------------------------------------------                                   
   -- ट्री फॉर बी - निसर्गात फॉर म्हणजे चार "बी" महत्वाचे आहे. बटरफ्लाय ( फुलपाखरे ), बॅट ( वट वाघूळ ), बर्ड ( पक्षी ), बी ( मधमाशा ). पिकलेली व फुटलेली फळं वटवाघळे व पक्षी खातात.या झाडाच्या पानांवर कॉमन मॉर्मन , राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन ,लाईम स्वालोटेल ई.फुलपाखरे तसेच पॅरोटीस मार्गीनेटा, पॅरोटीस वर्टीम्ना लीस हे पतंग अंडी घालून आपला जिवनक्रम आरंभ करतात.या फुलांवर आग्या मोहळाच्या एपीस डोरसॅटा या व एपीस मेलिफेरा या मधमाशा आकर्षित होतात ज्या सर्वच वृक्ष, पिके यांच्या फळधारणेस मदत करतात. पिवळ्या गांधींली, कार पेंटर भुंगे, फ्लावर फ्लाईस, विविध फुलपाखरे, बिट्ल्स कीटक, काळ्या मुंग्या यांना या फुलांचा मकरंद प्रिय असून त्याच याचे परागीभवन करतात. असे डॉ. संतोष पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

0 Comments