सोयगाव शहरासह आमखेड्यात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, आठ जणांना चावा, ग्राम पंचायत व नगरपंचायत चे दुर्लक्ष ---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२५--सोयगाव शहरासह आमखेडा परीसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत वाढली असून दि.२५ सोमवारी आठ जणांना चावा घेतल्याने शहरासह आमखेडा परिसरात खळबळ उडाली आहे.

याकडे आमखेडा ग्रामपंचायत व सोयगाव नगरपंचायत ने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान साई आगे वय १२ रा. सोयगाव, हर्षवर्धन वाघ वय ०८ वर्षे रा. सोयगाव, अथर्व परदेशी वय ०३ वर्षे , राजेंद्र बोडखे वय ४० वर्षे, ममता ठाकरे वय ०६ वर्षे, कृतिका मोरे वय १३ वर्षे,उमेश सुरे वय १९ वर्षे सर्व रा. आमखेडा या आठ जणांना एकाच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केल्याने शहरासह आमखेडा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्यानी चावा घेतलेल्या रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात डॉ.शैलेश खंदारे व आदी परिचारिका ज्योती आचारे यांनी प्राथमिक उपचार करून रेबीज इमिनोग्लोब्युलिन ही लस घेण्यासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवसात आठ जणांना चावा घेतल्याने ग्रामपंचायत आमखेडा व नगरपंचायत सायगाव यांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.सदरील पिसाळलेल कुत्र हे अचानक हल्ला करीत असल्याचे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाने प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. पिसाळलेले किंवा इतर कोणतेही कुत्र चावल्यास हलगर्जीपणा न करता त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन यावे असे आवाहन सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंदारे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments