नवीन व्यापारी संकुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात येणार-- सरपंच ओमेश जपे
सावळीविहीर बुद्रुक येथील एकता तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने बौद्ध पौर्णिमेला सकाळी येथील बौद्ध विहार येथे पूजन करण्यात आले. सायंकाळी बौद्ध विहार ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर एक मे महाराष्ट्र दिन व बौद्ध पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर बौद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पूजन झाल्यानंतर सरपंच ओमेश जपे यांनी बौद्ध पौर्णिमेनिमित्त आज सर्वांच्या साक्षीने व सर्वांच्या मार्गदर्शनानुसार नव्यानेच गावात बांधण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात येणार असल्याचे जाहीर करत असून लवकरच पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या व्यापारी संकुलाचे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले व बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, उपसरपंच विकास जपे, शांताराम जपे, पोलीस पाटील सुरेखा सुरेश वाघमारे, विनायक वाघमारे, गौतम गोडगे, बाबासाहेब पगारे, सुशांत पवार, सतीश वाघमारे, राजू वाघमारे, पप्पू वाघमारे, गोकुळ पवार, सौरभ पळसे, मुकेश वाघमारे, रामा वाघमारे, संजय वाघमारे, संतोष कसबे, कैलास खरात, शिवप्रसाद जाधव आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. येथे पंचशील,व वंदना घेण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला बंधू भगिनी उपस्थित होते.
0 Comments