राहता तालुक्यातील हनुमंतगाव मध्ये ज्ञानेश्वर अहिरे चषकाची रंगत आणखी वाढली असून आज या लढतीचा फायनल चा थरार रंगणार आहे.
हनुमंतगाव मध्ये ज्ञानेश्वर अहिरे चषक प्लास्टिक बोल क्रिकेट स्पर्धा मोठ्या थाटात सुरू आहे. प्रशस्त ग्राउंड मध्ये ही स्पर्धा भरवली गेली आहे. परिसरातील अनेक क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे त्यामुळे हनुमंतगावचे वातावरण क्रिकेटमय बनले आहे. पंचक्रोशीतील अनेक खेळाडू या स्पर्धेत आपली हजेरी लावून क्रिकेटचा आनंद घेत आहेत.
गेल्या पाच दिवसापासून ही स्पर्धा सुरू असून आज या स्पर्धेचा शेवटचा फायनलचा थरार हनुमंतगाव मध्ये रंगणार आहे त्यामुळे हा चषक नेमका कोणत्या गावाकडे जातो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक संघ हा चषक आपल्याकडे ठेवण्याची तयारी ठेवूनच मैदानात उतरणार आहे त्यामुळे या सर्व लढती अतिशय रंगतदार होणार आहेत. या लढती पाहण्यासाठी गावकरी उत्सुक आहेत. यामध्ये पहिले बक्षीस ११,११,११रुपये, दुसरे बक्षीस ५५५५ रुपये, तिसरे बक्षीस ३३३३ रुपये तर उत्कृष्ट फलंदाज ११११ रुपये, उत्कृष्ट गोलंदाज ११११ रुपये तर मॅन ऑफ द सिरीज ११११ रुपये असे भरगोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. आज सायंकाळी पाच वाजता विजेत्या संघांना गावातील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे. त्यामुळे या लढती पाहण्यासाठी मैदानात प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हनुमंतगाव क्रिकेट क्लब ने केले आहे.
0 Comments