राजुरी (वार्ताहर)
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ शुक्रवार दि. ८ मे रोजी सकाळी दहा वाजता प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित केला असल्याची माहीती विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.
या समारंभास किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, विश्वस्त ध्रूव विखे पाटील, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण दंत महाविद्यालय, डॉ. एपीजे अब्दुल कलाम फिजीओथेरपी महाविद्यालय, श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील नर्सिंग कॉलेज, बायोसायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी कॉलेज, स्कुल ऑफ पब्लिक हेल्थ अँण्ड सोशल मेडीसिन या महाविद्यालयांतील एकूण ३२२ पदवी, ३ पी.एचडी. अशा ३२५ विद्यार्थ्यांना पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहे.
0 Comments