हातात संविधान घोड्यावर बसून वधूची लग्नमंडपात एन्ट्री .निमगाव जाळीत परिवर्तनवादी लग्न सोहळा उत्साहात.



संगमनेर (प्नतिनिधी )

विविध धर्मातील पाच धर्मगुरू समवेत हातात संविधान घेऊन वधूचा घोड्यावर बसून लग्न मंडपात प्रवेश आणि उपस्थित सजग जनसमुदाय संविधानाच्या साक्षीने संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे विश्वदीप वाघमारे आणि विदिशा मुन्तोडे या नवदाम्पत्याचा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
तालुक्यातील कोंची येथील नालंदा बौद्ध आश्रमाचे प्रमुख धर्मगुरू महाबोधी करुणानंद बोधी यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वदीप व शिबलापूर येथील दिवंगत रविंद्र राजू मुन्तोडे यांची कन्या विदिशा यांच्या लग्न सोहळ्यासाठी राजकीय, धार्मिक,शासकीय सेवेतील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.भारतीय संविधानामुळे आज महीलाना जगण्याचा अधिकार मिळाला, महिलाचा गौरव व्हावा म्हणुन आदर्श बौध्द नववधु विदिशा हिस घोड्यावर बसून हातात भारतीय संविधान उध्देशिका डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा सोबत घेऊन आदर्श दिला.

असाच सर्वांच्या भाषणाचा सुर होता.यावेळी ॲड.किरण रोहम परिमल निकम,रमणलाल शिंगवी अर्चना राम गायकवाड चरण त्रिभुवन,शिवाभाऊ साठे प्रदिप थोरात 
नाथा आल्हाट संदीप खरात,विनोद गायकवाड, रमेश रूपवते फिरोजशहा पठाण,बंटी यादव
सचिन साळवे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments