श्रीरामपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिव स्वराज्य चौक, मेन रोड येथे नागरिकांसाठी सरबत वाटप करण्यात आले,
या उपक्रमातून समाजात समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. विशेषतः मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत त्यांना अन्नदान करून सेवाभावाची जाणीव करून देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण, शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण, नितीन भाऊ क्षिरसागर, युवा नेते विशाल मोजे, राष्ट्रीय सह्याद्रीचे करणजी नवले बाळासाहेब बागुल, मार्गदर्शक संदीप शेठ शेडगे, रमिज पोपटिया, सिकंदर भाई तांबोळी, सचिन भाऊ मंडलिक, रमजान शेख, नंदकुमार बगाडे, अविनाश भोसले, अलोक थोरात, अमोल क्षिरसागर, फैजान पठाण, शुभम बागुल, अफ्फान पठाण, साईराम थोरात आदींसह अनेक सामाजिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments