टाकळीभान: येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्टँड परिसर या ठिकाणी टाकळीभान दूरक्षेत्रचे पो.हे. बैसाने यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून तीनही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
तसेच ग्रामपंचायत या ठिकाणी गावातील मान्यवर व पदाधिकारी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आदी महापुरुषांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त गावामध्ये तीनही महापुरुषांना अभिवादन करण्यात येत असून समतेचा चांगला पायंडा गावामध्ये पडला आहे. स्टँड परिसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कु. पंकजा संदीप शिनगारे हिने डॉ. बाबासाहेबांच्या कार्य कर्तुत्वाबद्दल सुंदर विचार मांडले.
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल, सर्व जिल्हा परिषद शाळा, ग्रामीण माध्यमिक विद्यालय, गावातील पब्लिक स्कूल आदी सह विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार, अशोकचे कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे,शेतकरी संघटनेचे प्रवक्ते प्रा.कार्लस साठे सर, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे, नारायण काळे,ॲड रत्नकर रणनवरे, मुकुंद हापसे, अनिल बोडखे, बापूसाहेब शिंदे, विजय आहेर,संजय रणनवरे,सुंदर रणनवरे, मोहन रणनवरे, मल्हार रणनवरे, सतीश रणनवरे, जॉन रणनवरे,शिवा साठे,भाऊसाहेब गव्हाणे, अशोक रणनवरे, अण्णासाहेब दाभाडे,राजेंद्र रणनवरे , बाळासाहेब शेळके,आनंद कांबळे,संतोष कांबळे, राजेंद्र साळवे, संदीप शिंगारे, ग्रामसेवक दादासाहेब भिंगारदे व ग्रामपंचायत कर्मचारी आदीसह गावातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments