सावळीविहीर बु. येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी.!

राजकुमार गडकरी 


शिर्डी (प्रतिनिधी)-राहता तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बुद्रुक मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचनाने करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रयत सेवक श्री.सागर पठारे सर आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता सहावीतील चि. तन्मय सतीश वाघमारे आणि इयत्ता नववीतील चि. सिद्धार्थ मिलिंद पवार यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या विषयी आपले विचार मांडले. इयत्ता पाचवीच्या लहान विद्यार्थिनींनी बाबासाहेबांच्या गीतावर नृत्य केले. यावेळी सहावीचा विद्यार्थी चि.जाधव दिगंबर शिवप्रकाश याने डॉ.बाबासाहेब यांच्या सारखा पोशाख परिधान केलेला होता. तसेच शिक्षक मनोगतातून श्री.धीवर सर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यामुळे समाजात घडलेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकला. गीत गायनाद्वारेही डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बनसोडे सर यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागला याची माहिती दिली व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री. खेडकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कानडे मॅडम यांनी केले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. डहाळे मॅडम, श्री. म्हस्के सर, श्री. काळेगोरे सर, श्री. खान सर, श्री. खेडकर सर, श्रीमती कानडे मॅडम, श्री. धीवर सर, श्री. वाकचौरे सर तसेच ज्येष्ठ लेखनिक श्री. लोखंडे सर व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments