भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तन यांचा दीपस्तंभ--कैलासराव खरात;


लक्ष्मीवाडी येथे अजिंक्य युवक मंडळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!

शिर्डी (प्रतिनिधी)
विश्वभूषण , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान स्वाभिमान आणि परिवर्तन यांचा दीपस्तंभ होते. त्यांचे कर्तुत्व व विचार खूप महान असे होते. आज त्यांच्या विचाराचे कृतीतून प्रत्येकाने आचरण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व अजिंक्य तरुण मंडळ लक्ष्मीवाडीचे ज्येष्ठ युवा नेते कैलासराव खरात यांनी व्यक्त केले. 
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील लक्ष्मीवाडी येथे अजिंक्य तरुण मंडळ हे नेहमी विविध सामाजिक उपक्रम व विविध कार्यक्रम राबवत असतात ‌. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी व मोठ्या उत्साहात त्यांनी साजरी केली. प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच ओमेश जपे, सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, उपसरपंच विकास जपे, तंटामुक्तीचे अध्यक्ष जिजाबा आगलावे, सोपानराव पवार,गणेश कापसे, संदीप विघे, प्रमोद कोपरे , संजय वाघमारे,संजय जपे, विलासराव भोसले,कैलास पळसे, अमोल भोसले, संतोष कसबे, शरद गडकरी, संतोष गायकवाड , भाऊसाहेब सातदिवे,बौद्धाचार्य गौतम गोडगे, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
लक्ष्मीवाडी कारखाना परिसरात झालेल्या या जयंती कार्यक्रमात कैलासराव खरात यांनी पुढे बोलताना सांगितले की, लक्ष्मी वाडी कारखान्यातील रहिवाशांना गावातील ग्रामस्थ पदाधिकारी कोणतेही प्रश्न समस्या आल्या तर ते सोडवतात. ग्रामस्थांचे नेहमी येथील रहिवाशांना सहकार्य असते. येथील सर्व रहिवाशांना गावातील नागरिकांकडून नेहमी सहकार्य व स्नेहपूर्वक वागणूक दिली जाते .अशा ग्रामस्थांचे व कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचे त्यांनी यावेळी धन्यवाद मानले. 
या कार्यक्रमात सरपंच ओमेश जपे, बाळासाहेब जपे, जिजाबा आगलावे, गणेश कापसे,आदींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या छोटेखाणी भाषणातून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमानंतर छोट्या मुलांचा भीम गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजिंक्य तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व लक्ष्मीवाडी परिसरातील युवक ,ग्रामस्थ यांनी मोठे परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments