बाजार समितीच्या संचालकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल


दिलीप लोखंडे 

श्रीरामपूर प्रतिनिधी :-महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला येथील दोन कुटुंबात जागेवरुन तनाव निर्माण झाल्याने याबाबतचा वाद थेट श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यापर्यत गेल्याने बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, सागर गायकवाड व इतर पाच ते सहा इसमांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात अॕट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        अनिता नाथा तडके यांनी श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे कि, दि. १३ एप्रील रोजी राञी ८.२० वाजेच्या सुमारास गावातील महीला डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाचनालय सुरु करायचे आसल्याने महाराष्ट्र बँके शेजारच्या एका रुमची साफसफाई करीत आसताना मयुर अशोक पटारे, सागर भगवान गायकवाड व इतर अनोळखी सहा ते सात ईसम तेथे आले. त्यापैकि आरोपी नं. १ व २ यांनी तुंम्ही येथे वाचनालय सुरु करायचे नाही. तुंम्ही महार लोक आहात असे म्हणुन अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिविगाळ करुन आरोपी नं. एक यांने त्याच्या जवळील गावठी कट्यासारखे हत्यार व चाकु दाखवुन धमकि दिली. तसेच फिर्यादीची साडी ओढुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.तसेच धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकि दिली. त्यामुळे फिर्यादिच्या दिलेल्या फिर्यादिवरुन श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं. १०५/२०२६ नुसार भा. न्या. सं. का. अनु. जाती जमातीचे कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागिय पोलिस आधिकारी भवर हे आधिक तपास करीत आहेत. तर श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यातही हरेगाव फाटा येथील महाराणाप्रताप हौसिंग सोसायटी येथे राहाणार्या ३८ वर्षिय महीलेनेही एक गुन्हा दाखल केला आहे. पो.हे.काँ. शेलार हे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments