दिलीप शिंदे
सोयगाव दि. २९-- सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचालित अंजनाई गोशाळेतील चाऱ्याला अचानक लागलेल्या आगीत ३० क्विंटल चारा व गुरांना चारा खाऊ घालण्यासाठी घेतलेले ३० कॅरेट या आगीत भस्मसात झाल्याने गोशाळेचे सव्वा लाख रुपये पर्यंत नुकसान झाल्याची घटना दि.२८ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. गुरे बाजूला चरत असल्याने मोठी जीवित हानी टळली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचालित अंजनाई गोशाळेतील चाऱ्याला दि.२८ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली होती. आग विझविण्यासाठी ज्ञानेश्वर गाडेकर,अनिल लोखंडे, रामेश्वर बोडखे, एकनाथ ठोंबरे,पवन आगे, ज्ञानेश्वर जाधव, संदीप इंगळे,दिलीप शिंदे आदींनी शर्यतीचे प्रयत्न केले.मात्र हवा जास्त असल्याने पाच तासांच्या अथक शर्यतीनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.मात्र तो पर्यंत गोशाळेतील ३० क्विंटल चारा व गुरांना चारा खाऊ घालण्यासाठी घेतलेले ३० कॅरेट जळून खाक झाली.यामुळे गोशाळेचे सव्वा लाख रुपये पर्यंत नुकसान झाले आहे. दरम्यान ग्राम महसूल अधिकारी महेंद्र वारकड यांनी जायमोक्यावर जाऊन घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात दाखल करण्यात आला.
0 Comments