लोहगाव (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता दहावीच्या १९८३ च्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयास सायकल स्थानक देणगी मिळाले आहे.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने या विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांपैकी नियोजित ६ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या सायकल स्थानकाच्या उभारण्याची जबाबदारी इयत्ता दहावीच्या १९८३ च्या माजी विद्यार्थ्यांनी स्वीकारली आहे.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या १९८३ च्या माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आली होते. या बैठकीत सर्वांनी एकत्रित निधी संकलन करून विद्यालयास सायकल स्थानक देणगी देण्याचे निश्चित केले.
यावेळी बाभळेश्वर येथील श्री एकनाथ पतसंस्थेकडून ३१ हजार रुपयांची देणगी चेअरमन रामदास बेंद्रे यांनी प्राचार्य विनायक मेथवडे यांचेकडे सुपूर्द केली. याप्रसंगी उपाध्यक्ष अरुण कडू, साहेबराव शिंदे, राजेंद्र म्हस्के, संजय इनामके, शिवाजी बेंद्रे, अनंता खर्डे, संजय आहेर, शशिकांत गणेश, परशुराम थेटे, अनिल लोढा यांच्यासह मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, उपप्राचार्य संजय डुबे, संजय ठाकरे, बाबासाहेब अंत्रे हे उपस्थित होते. बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट यांनी केले.
0 Comments