सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात साजरी....





दिलीप शिंदे 
सोयगाव, दि. २३ -- सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे दि.२२ बुधवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,शिवाजीनगर (प्लॉट) येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला होता.


 ढोल-ताशांच्या गजरात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक गलवाडा गावात पोहोचली. गावात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी लहान मुलामुलींनी आकर्षक देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अनिल इंगळे, आनंदा इंगळे, जीवन पाटील, किरण इंगळे , सुनील सैदाणे, पंजाबराव कुनगर, दीपक सोनवणे, अक्षय औरंगे, ओम इंगळे, रमेश चक्के, यश देशमुख, ऋषिकेश देशमुख, निलेश इंगळे, रणवीर इंगळे, शुभम पाटील, गोपाल पाटील, रोहित देशमुख, विजय सोनवणे, योगेश इंगळे, आशुतोष पाटील, गोपाल मंडवे, विकास मंडवे, शिवानंद औरंगे, सुमित खिरडकर, ललित इंगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments