न्यू इंग्लिश स्कूलच्या २००३ -०४ एस .एस . सी .बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न




टाकळीभान प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील एस . एस . सी बोर्ड २००३ - ०४च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा विद्यालयात नुकताच पार पडला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक पऱ्हे सर हे उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . यावेळी बॅचच्या दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक पर्हे सर यांनी माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा ठेवल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले .सर्वांनी जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले .यावेळी माजी शिक्षक दहिफळे सर ,चव्हाण सर, डौले सर ,साठे सर ,धनवडे सर ,कोळसे सर ,देठे मॅडम, गलांडे सर, कुदळ सर, शेजुळ सर व अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते .यावेळी अनेक माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांनी विद्यालयाप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केले . यावेळी सविता पटारे मोहोळ ,सोनाली मगर. अर्चना नागवडे ,कृष्णा भालेराव, विलास पटारे ,किरण जाधव, महेश मगर, विनायक बोरुडे ,प्रमोद राव, गणेश दुल्लम ,सागर 
 रणनवरे , सोमनाथ राऊत, वृषाली कोकणे, योगिता तुवर, कावेरी पांडांगळे यांनी मनोगत व्यक्त केले .२००३ - ०४ च्या बॅचने कृतज्ञतेच्या भावनेतून विद्यालयासाठी 5000 लिटर पाण्याची टाकी बांधून देण्याचे आश्वासन दिले .व वस्तीगृहाला पाच हजार रुपयाची वस्तू स्वरूपात देणगी देणार आहे,
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र बनकर ,सूत्रसंचालन स्वाती पटारे , गोकुळ मोरे यांनी तर आभार संभाजी पटारे यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments