पटारे यांच्यासह इतर व्यक्तींविरोधात दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा

दिलीप लोखंडे 

टाकळीभान ग्रामस्थांचे अपर पोलीस अधिक्षकांना निवेदन

टाकळीभान प्रतिनिधी:-श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, सागर गायकवाड व इतर सहा ते सात जणांविरुध्द दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी टाकळीभान ग्रामस्थांनी अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
     निवेदनात म्हंटले आहे की, १३ एप्रिल २०२६ रोजी येथे जागेच्या वादावरुन दोन कुटुंबात वाद झाले. सदर वाद श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गेल्याने याबाबत कुठलीही चौकशी न करता बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, सागर गायकवाड व इतर सहा ते सात जणांविरुध्द तातडीने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. मयुर पटारे हे एक तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत. ग्रामस्थांच्या मुलभूत समस्या सोडण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता स्थानिक पातळीवर वाढत असल्याने विरोधी राजकीय पुढाऱ्यांचे महत्व कमी होत असल्याचे दिसत आहे.
पटारे हे आपली बाजू मांडण्यासाठी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी फिर्याद दाखल करण्यासाठी जमा झालेल्या जमावाने पोलीस ठाण्याच्या आवारातच मयुर पटारे यांना मारहाण केली. याबाबतचे पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, पोलीस यंत्रणेवर दबावतंत्राचा वापर झाल्याने, खोटा गुन्हा दाखल झाला आहे, तरी पटारे व इतर व्यक्तिंविरोधात दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अन्यथा सकल मराठा समाज व ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाहीत,असे निवेदनात म्हंटले आहे.         
     यावेळी अशोकचे संचालक निरज मुरकुटे, मंजाबापू थोरात, शिवाजी शिंदे, अॅड, रत्नाकर रणनवरे, अॅड. राजेंद्र कापसे, सुनिल बोडखे, विलास दाभाडे, किशोर पटारे, अनिल पटारे, अनिल बोडखे, बापूसाहेब शिंदे, संजय पटारे, शिवाजी पटारे, रमेश पटारे, दिगंबर मगर, नितीन पटारे, सुजित बोडखे, सुरेश पटारे, रंजित मगर, जितेंद्र पटारे,गणेश छल्लारे, दादासाहेब कापसे, दत्तात्रय पटारे, भाऊसाहेब पटारे, संतोष पटारे, पंडीत पवार आदी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. तर निवेदनावर सभापती सुधीर नवले, राजेंद्र पाऊलबुध्दे, विष्णुपंत खंडागळे, देवदास कोकणे, प्रा. जयकर मगर, राजेंद्र कोकणे, भाऊसाहेब मगर, बापुराव त्रिभुवन, यशवंत रणनवरे, दिलीप कोकणे, शरद मगर, बापूसाहेब पटारे, बाबासाहेब तनपुरे, रामदास नाईक, अनिल कोकणे, जालींदर बोडखे, मच्छिंद्र कोकणे, रावसाहेब वाघुले, बंडू पटारे, अशोक शिंदे, विजय कोकणे, मुकुंद हापसे, संदिप सपकळ, सुरेश गटकळ, बाबासाहेब थोपटेल, ज्ञानदेव साळुंखे ,यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments