टाकळीभान प्रतिनिधी: येथील सोमवार दि.20 व मंगळवार दि.21 रोजी होणाऱ्या दोन दिवसीय यात्रोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही तसेच नवीन महिलांबाबत तक्रारी व इतर जातीय व धार्मिक वातावरण बिघडवणाऱ्या इसमाविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल होणार असून त्यांना जामीन होणे मुश्किल होणार असल्याने शांततेत यात्रा उत्सव पार पडावा असे आवाहन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले.
यात्रा कमिटी व ग्रामस्थांची यात्रा शांततेत पार पडावी यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी धनवडे बोलत होते.
प्रारंभी राजेंद्र कोकणे यांनी दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सव कार्यक्रम संदर्भात माहिती दिली. व पो.निरीक्षक धनवडे व त्यांचे सहाय्यक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.
यावेळी धनवडे बोलताना म्हणाले की सर्व देव देवतांनि,व महापुरुष यांनी मानवता व एकता व समतेचा संदेश जगाला दिला आहे.त्याचे पावित्र्य आपण राखावे.त्यांच्या विचारांना जगात मान आहे.तो मान, आदर आपण टिकून ठेवावा.लहान, मोठा हा भेद दूर ठेऊन आपण सर्वांनी एक म्हणून वावरावे.सर्वच धर्मांनी चांगली शिकवण दिली आहे. यात्रोत्सव काळात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणे,विटंबन करणे व महिलांची छेड, छाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर तत्काळ कारवाई होईल.तसेच ज्या गुन्हेगारावर तीन चार पेक्षा जास्त गुन्हे आहेत,सदर गुन्हेगार परत गुन्ह्यात सापडल्यास ते सुटणार नाहीत असा इशारा ही त्यांनी दिला.पालकांनी आपली मुले काय करतात,कोणाच्या संगतीत आहे याचि काळजी घ्यावी.तरुणावर काही गैर कृत्यामुळे गुन्हा नोंदवल्यावर त्यांचे करिअर धोक्यात येते त्यामुळे नवीन तरुणांनी विशेष काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. यात्रेच्या परिसरात दारू पिऊन हिंडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल.त्याचप्रमाणे दोन्ही दिवस यात्रे साठी चांगला बंदोबस्त देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरी नागरिकांना काही समस्या किंवा तक्रार नोंदवायची असल्यास ११२ यावर कॉल करावा आपल्याला त्वरित पोलिस यंत्रणेची मदत मिळण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकी प्रसंगी तंटामुक्तीचे आबासाहेब रणनवरे, ,अमोल पटारे, गजानन कोकणे,प्रा.कार्लस साठे,गोरक्ष कोकणे, विशाल पटारे,बापूसाहेब शिंदे,बंडोपंत बोडखे,मधुकर गायकवाड,संजय पटारे,बंडोपंत कोकणे, सुनिल बोडखे,काका डिके,उमेश त्रिभुवन,रामनाथ माळोदे, प्रा.जयकर मगर, भाऊसाहेब गव्हाणे, सुलताने,म्हस्के, बाबा सय्यद, पत्रकार आदी सह यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments