लोणीत रंगला भक्तीचा सोहळा
लोणीत रंगला हरिनामाचा सोहळा,
त्या सृष्टीरचयिताचे वर्णन करण्यास
भक्तगण आले गोळा...!

अवघा वैष्णवांचा हा मेळा,
जमली त्या भगवंतासाठी...
तो ज्ञानदेव माझा आहे,
चराचरातल्या सर्वांसाठी...!
"राम कृष्ण हरी" नामघोषाने अवघे
लोणी परिसर दुमदुमले...!
त्या माऊलीच्या कृपेने
आज वैष्णवजन धन्य पावले...!
पांडुरंग तो हात कमरेवरी
ठेवूनी उभा आहे...!
सारी सृष्टी तो जणू काही
नजरेतूनी न्याहाळत आहे...!
धावपळीच्या या जीवनाच्या
गती देण्यासाठी अध्यात्माची
जोडही असायला हवी...!
सारे काही संपूनही पुन्हा
नव्याने निर्माण करण्याची
उमेद असायला हवी...!
भक्तीच्या या वाटेवरती,
अखंड माणुसकी जपावी...
संकटाच्या अंधारातही,
विठ्ठल नावाची ज्योत जळावी...!
भेदाभेद सारे विसरून आपण,
एकतेचा मंत्र गाऊया...
या पवित्र लोणी नगरीत,
भक्तीचा मळा फुलवूया...!
 
..... सत्तेचा महासंग्राम
    लेखिका प्रतिनिधी - रूपाली निलेश भालेराव 
     ... सहसंपादक - साबळे ज्ञानेश्वर