देव पहावा शेतकऱ्याच्या शेतात राबताना..‌ रुपाली भालेराव

देव पहावा असा...
देव आपण म्हणतो...
हा देव पाहिलाय कधी..?
देव पहावा शेतकऱ्याच्या
शेतात राबताना...
देव पहावा प्रेमाने कुरवाळणाऱ्या
आईच्या मायेच्या हातात..!
देव पहावा निरागस
लहान मुलांच्या अवखळ हसण्यात..!
देव मानणाऱ्यांसाठी त्याचे
अस्तित्व आहे...!
देव नास्तिकांसाठी तो एक 
आभास आहे...!
देवाला प्रसन्न करण्यासाठी
पाव किलो पेढे घेऊन जातो...!
सारी सृष्टी घडवत
असताना तो कुठे काय मागतो...!
देव हा माणुसकी जपणाऱ्या
माणसात शोधावा...!
देव हा गाभाऱ्यात नसून तो
दिव्याच्या प्रकाशात शोधावा...!
नक्कीच दिसेल तो
एक ना एक दिवशी...
खोट्याच्या या जगात
खऱ्यांचाही येणार
असाच एक दिवस...
रुपाली निलेश भालेराव लोणी बुद्रुक

Post a Comment

0 Comments