शिर्डी व पंचक्रोशीतील सर्व हिंदू बांधवांना एकत्र आणून हिंदू विचार बळकट करण्यासाठी सकल हिंदू समाज आयोजित हिंदू महासंमेलन बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता साई किमया गार्डन एअरपोर्ट रोड ,शिर्डी येथे आयोजित करण्यात आले असून या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने सहपरिवार सामील व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने सावळी विहीर बु. येथील श्री हनुमान मंदिरात नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विठ्ठल जाधव, सचिन शिरोळे, शांताराम जपे, रामदास आगलावे, रावसाहेब एखंडे ,रावसाहेब आगलावे, संदीप विघे, किरण जपे, राजू वाघमारे, सोनवणे साहेब, ढवळे मेजर,मनोज जपे,साईश गडकरी,आदी मान्यवर उपस्थित होते.
शिर्डी येथे बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता साई किमया गार्डन एअरपोर्ट रोड शिर्डी येथे हे हिंदू महासंमेलन शिर्डी व पंचक्रोशीतील हिंदू बांधवांसाठी आयोजित करण्यात आले असून हिंदू विचार बळकट करण्यासाठी ते होणारअसून सर्व पंथ जाती विसरून हिंदू धर्मासाठी एकत्र येण्यासाठी हे हिंदू महासंमेलन असल्याचे यावेळी विठ्ठल जाधव यांनी सांगितले. या हिंदू महासंमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून वरद विनायक देवस्थान ट्रस्ट लोणीचे गुरुवर्य हभप उद्धव महाराज मंडलिक, अहिल्या नगर जिल्ह्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते रवींद्र गणेश मुळे( राजाभाऊ) तसेच हिंदुत्ववादी विचारक भरत उत्तमराव आमदापुरे हे व इतर अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. असे सांगितले.या बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन या हिंदू महासंमेलनासाठी शिर्डी व पंचक्रोशीतील गावांमधील वाड्या वस्त्यांवरील सर्व हिंदू बांधवांनी हिंदू धर्माचे संस्कार आपल्या मनामनात रुजवण्यासाठी या हिंदू महासंमेलनाला सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात येऊन यावेळी गावामध्ये या हिंदू महासंमेलनाच्या कार्यक्रम पत्रिका वाटण्यास शुभारंभ करण्यात आला. या नियोजन बैठकीसाठी ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments