*ह भ प भास्करगिरी महाराजांना मातृशोक*

दिलीप लोखंडे 

 श्रीक्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे आज रविवार दि. १२ |०४/२०२६ रोजी सकाळ ठीक६-१४ मी. वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
 त्यांचा अंत्यविधी श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात आज सायंकाळ 4.30 वा. होणार आहे.
 मृत्यू समयी त्यांचे वय ९९ वर्षे होते. सरूबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्या पश्चात दोन मुले ह भ प भास्करगिरी महाराज व मधुकर पेसोडे व कन्या कमलबाई रायपुरे आहेत. सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्या दुःखद निधनाने देवगड परिसरातील नागरिकांवर तसेच भक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments