तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्या लेखी आदेशाशिवाय कारवाई करू शकत नाही!- ग्राम महसूल अधिकारी क्षितिज निंबाळकर



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०३-- सोयगाव तालुक्यातील फर्दापूर - जळगाव महामार्गावरील फर्दापूर पासून काही अंतरावरील भाग हा वरखेडी बू.- धनवट ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येतो. महामार्गालगत असलेल्या धनवट परिसरात व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे.

राजकुंवर महाविद्यालयाच्या समोर सुरू असलेल्या बांधकामात अंदाजे तीन शे ते चारशे ब्रास मुरुमची अवैधरित्या गौण खनिज माफियांकडून वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार दि.०१ रविवारी सायंकाळी समोर आला होता. धनवट चे ग्राम महसूल अधिकारी क्षितिज निंबाळकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून छायाचित्रासह माहिती देण्यात आली होती परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.दरम्यान दि.०२ सोमवारी सायगाव तहसील कार्यालय येथे धनवट चे ग्राम महसूल अधिकारी क्षितिज निंबाळकर यांना अवैधरित्या गौण खनिज वाहतूक प्रकरणी काय कारवाई करण्यात याबाबत विचारले असता त्यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मनिषा मेने-जोगदंड या कारवाई बाबत लेखी आदेश देत नाही तो पर्यंत कारवाई करू शकत नाही असे प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. तालुक्यात अवैधरित्या वाळू व गौण खनिज वाहतूक सर्रास सुरू आहे. भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याने तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाळू साठ्याचे लोकेशनसह माहिती देऊनही बनोटी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई केली नसल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. वाळू व गौण खनिज माफिया यांचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लागेबांधे असल्याने ग्राम महसूल अधिकारी कारवाई करीत नाही की तहसीलदार हे अवैधरित्या वाळू व गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यापासून पासून ग्राम महसूल अधिकाऱ्यांना रोखत असल्याची चर्चा ग्राम महसूल अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. पिंपरी येथील शेतकऱ्यांकडून महसूल कर्मचारी याने कारवाई न करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप सोयगाव येथे तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत झालेल्या आमसभे मध्ये करण्यात आला होता.यावेळीं सिल्लोड तहसील कार्यालयात त्या कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली होती. वरिष्ठांचे आशीर्वादामुळे सिल्लोड तहसील अंतर्गत वसुलीसाठी तत्पर असलेल्या कर्मचाऱ्याने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी २०,०००₹ लाज स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. आर्थिक व्यवहारातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुन्हा सोयगाव तहसील कार्यालयात बदली करण्यात आली. सोयगाव तहसील कार्यालयात हजर होताच गौण खनिज वाहतुकीवर तहसील कार्यालयाकडून कारवाई केली जात नाही.यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.जिल्हाधिकारी निद्रावस्थेत तर पोलिस प्रशासनही कारवाई का करीत नाही हे मात्र निरुत्तरित आहे. महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महसुलच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments