तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षक कुलकर्णीसह 5 जणांवर अखेर गुन्हा दाखल...





  टाकळीभान प्रतिनिधी- पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तुझ्याशी लग्न करील असे अमिष दाखवून तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याने मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीनी आत्महत्या केल्याच्या आरोपावरुन श्रीरामपुरातील संगीत शिक्षक अवधुत कुलकर्णी याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत योगेश सुरेश जहागिरदार,वय ५१,रा.दळवी वस्ती,वॉर्ड न.०७,श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली मोठी मुलगी साक्षी हिचा विवाह तेजस दिपक भिडे रा. श्रीरामपूर यांचेबरोबर झाला. त्यापूर्वी अवधूत कुलकर्णी याने भिडे कुटुंबातील मुलगी अमृता भिडे हिच्याशी लग्न केले होते. अमृता भिडे व साक्षी जहागिदार या नात्याने सख्या नणंद लागत होत्या. त्यामुळे नातेसंबंध असल्याने अवधूत कुलकर्णी याची आमच्या कुटुंबासोबत ओळख झाली. नंतर कौटुंबिक वाद होवून अवधूत कुलकर्णी व त्याची पत्नी अमृता तसेच माझी मुलगी साक्षी व तिचे पती तेजस यांच्यात कौटुंबिक वाद होवून हे फारकतीचे प्रकरण श्रीरामपूर न्यायालयात प्रलंबित आहे.आपली लहान मुलगी कु.रक्षा जहगिदार,वय २३ ही बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकते. ही अवधूत कुलकर्णी याच्या घरी अभ्यास करण्यासाठी अधूनमधून जायची व तेथे मुक्कामीही राहायची.
       दरम्यान ०३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपण श्रीइम्पेक्स फर्निचर मॉल एमआयडीसी, श्रीरामपूर येथे कामावर असताना दुसऱ्या मुलीने फोन करुन साखर कामगार हॉस्पिटलला बोलावले. तेंव्हा तिने सांगितले की, आपली रक्षा आपल्याला सोडून गेली.तिने असेही सांगितले की,आपण गावात आलेलो असताना अवधूत कुलकर्णीचा फोन आला त्याने त्याच्या घरी बोलावले. तेंव्हा कळाले की,आपली बहिण रक्षा हिने अवधूत कुलकर्णी याचे घरातील पंख्याला गळफास घेतला. कुलकर्णी याने तिला खाली उतरवून साखर कामगार रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर रक्षा हिने गळफास घेतलेल्या ठिकाणी एक चिठ्ठी आढळून आली. त्यावर तिने म्हटले आहे की, आरती भिडे, तेजस भिडे, दिपक भिडे, अमृता अवधूत कुलकर्णी व इतर नातेवाईक अशांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केलेले आहे. त्यावेळी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र कु. रक्षा जहागिदार ही कोर्टाच्या केस संदर्भात बहिणीबरोबर कोर्टात जायची तसेच दोन्ही कुटुंबातील वाद मिटविण्यासाठी घरात बैठका व्हायच्या त्यावेळी आपल्या मुलींच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करुन अवधूत कुलकर्णीशी संबंधत जोडत त्यांची बदनामी करायचे. त्यामुळे आपली लहान मुलगी मानसिक तणावात रहायची. अवधूत कुलकर्णीने दाखवलेले लग्नाचे अमिष आणि इतर आरोपींनी तिला वेळोवेळी दिलेला मानसिक त्रास यामुळेच प्रवृत्त होवून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
    

    योगेश जहागिरदार यांच्या फिर्यादीवरुन दिपक दत्तात्रय भिडे, आरती दिपक भिडे, अमय उर्फ तेजस दिपक भिडे, अमृता अवधूत कुलकर्णी (भिडे), अवधूत शांताराम कुलकर्णी यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. तरी हा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बहुजन क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी 11 दिवस उपोषण केले होते.

Post a Comment

0 Comments