. सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि पर्यावरणीय पद्धतीबद्दल व सुरक्षा या संदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी भारत देशामध्ये दरवर्षी चार मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या स्थापनेची स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणजे भारत देशामध्ये प्रतिबंधात्मक सुरक्षा संस्कृती मजबूत करण्याची एक प्रमुख उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणजे आपल्या देशांतर्गत आणि बाह्य दोन्हीही धोक्यांपासून आपल्या राष्ट्राचे संरक्षण करणे हा प्रमुख उद्देश राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात पाठीमागचे आहे. यामध्ये आपल्या भारत देशाचे सार्वभौमत्व; अखंडता आणि आपल्या भारत देशामध्ये वास्तव्य असलेल्या नागरिकाचे कल्याण करणे गोष्टींचा समावेश केला जातो. आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय सुरक्षा दिन पाळण्याचा प्रमुख प्रमुख उद्देश म्हणजे भारत देशामध्ये शांतता आणि स्थिरता राखणे हा आहे...
आपल्या भारत देशातील राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना सुरक्षिततेची आणि स्थिरतेची हमी देणे हे होय. सुरक्षा आणि स्थिरता यामध्ये आपल्या भारत देशातील सीमांची संरक्षण. आंतरिक सुरक्षा.आणि भारतीय भारतीय नागरिकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जे मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्या हक्काचे संवर्धन आणि जपणूक करणे हेआहे. आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्याची सुरुवात 4 मार्च 1972 रोजी झाली आहे. त्याअगोदर 1966 मध्ये सरकारच्या कामगार मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना केली. या संघटनेने सन 1972 मध्ये 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची आपल्या भारत देशातील सर्व समावेशक कुठल्याही प्रकारचा जात धर्म वंश भाषा असा भेदभाव न करता सर्वांच्या सुरक्षेसाठी ही राष्ट्रीय सुरक्षा परिषद काम करते. ही संस्था आपल्या भारत देशातील लोकांना त्यांच्या कामाच्या संदर्भात पुरेशी सुरक्षा व्यवस्था स्थापन करण्यास प्रवृत्त करीत असते. त्यांच्या सुरक्षिततेच्या ज्या काही अडचणी असतील; किंवा सुरक्षिततेच्या गुंतागुंतीची जाणीव करून देते. आपल्या भारत देशामध्ये कामाची अशी काही क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी कामगार सुरक्षित नाही विविध अशा प्रकारच्या आपत्कालीन घटना त्या ठिकाणी घडत असतात. या ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता ही धोक्यात येत असते. अनेक वेळा कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आपला जीव गमावा लागतो. किंवा अपघाताला बळी पडावे लागते. या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आणि त्यातूनच राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात येऊ लागला. आपल्या देशाच्या भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत अशा प्रकारचे हक्क दिले आहेत . कामगारांच्या संदर्भात देखील काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे निर्णय लिखित स्वरूपामध्ये आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या संदर्भात अनेक विविध अशा प्रकारच्या सुख सुविधा संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत. कामगारांच्या हक्कावर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही याची देखील काळजी संविधानामध्ये नमूद केलेली आहे. या सर्व गोष्टींचे पालन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये केले जाते .आणि म्हणून भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सुरक्षा दिन हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.
शेवटी जाता जाता मी असे म्हणेल की ^^आपली सुरक्षा केवळ आपली जबाबदारी आहे. सुरक्षा सोबत नातं तोडल्यास काळाआधी जीवन संपेल.^^
^^जीवनात सुरक्षा सर्वतोपरी आहे.
सुरक्षा विना सर्वच व्यर्थ आहे.^^.
= =शेवटी माझ्या सर्व भारतवासीयांना राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा==
=====जयहिंद====
प्राध्यापक ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे
(पोलीस क्राईम न्यूज ब्यूरो चीफ )
साकुरी. तालुका= राहता. जिल्हा=अहिल्यानगर
मो. ९६०४७९७३१६
0 Comments