लोणी पो. स्टे. कडून ममदापूर येथे बेकायदा गोवंश कत्तल करणाऱ्यांवर धडक कारवाई! सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !




शिर्डी( प्रतिनिधी)- राहता तालुक्यातील लोणी पो. स्टे. कडून ममदापूर येथे बेकायदा गोवंश कत्तल करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली असून सुमारे सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीत ममदापूर गावात दोन मार्च 2026 रोजी गोवंश कत्तल चालू असल्याबाबत गोपनीय माहिती लोणी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व पोलीस अमंलदार यांना मिळाल्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे रेहान मोहम्मद अय्याज कुरेशी यांच्या घराला लागून असलेल्या पत्राच्या शेडमध्ये ममदापुर तालुका राहता येथे छापा टाकून लोणी पोलिसांनी कारवाई केली असता सदर ठिकाणी रेहान मोहम्मद अयाज कुरेशी हा एक लाख साठ हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले 800 किलो वजनाचे गोमांस व जवळच इनोव्हा कार- एमएच ०४- डीजे 81 29 मध्ये तीनशे किलो वजनाचे गोमांस सह पाच लाख साठ हजार रुपये किमंतीचे वाहनासह मिळून आला असून त्याचे तीन साथीदार पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले आहेत.

 तरी सदर छापा कारवाई मध्ये एकूण सात लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आलेला असून आरोपी रिहान महंमद अय्याज कुरेशी ,मोहम्मद अयाज कुरेशी व इतर दोन अनोळखी राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्याविरुद्ध लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 90/ 2026 भारतीय न्याय संहिता कलम 271 /325/ 351 (2) 351( 3 )3 ,5 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम पाच, नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ ,पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे, पोलीस हे कॉन्स्टेबल अविनाश मकासरे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल साईनाथ राशिनकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते ,यांनी केलेली आहे. अधिक तपास लोणी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments