सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त महानगर पालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत असून
राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज त्याच बरोबर राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास मिळावा*
या मागणी साठी पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठ मंडळ गुरुवार दिनांक 5/3/2026 रोजी विभागीय आयुक्त पुणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे या शिष्ठ मंडळात पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी संघटक गणेश निंबाळकर दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी यांचा समावेश असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.
0 Comments