वाकडी सब स्टेशन मधून चितळी डिस्टीलरीला वीज पुरवठा देऊ नये शेतकरी व ग्रामस्थांची मागणी

राहाता (प्रतिनिधी)

.शिवाय मागील वर्षी ग्रामसभेत चितळीला लाईट जोडू नये असा ठराव संमत करण्यात आला होता तरी देखील महावितरण कंपनीचे अधिकारी मनमानी कारभार करत असेल तर शेतातील ऊभे पिके जळल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील.

सर्व वाकडी खंडोबाची गावातील शेतकरी बंधू भगिनींनी यांना कळविण्यात येते की आपण 26/1/2025 रोजी ग्रामसभेत ठराव केला होता की शेती पंपाना कमी दाबाने विजपुरवठा होतो त्यामुळे वाकडी सबस्टेशन मधुन चितळी येथील कंपनीस लाईट जोडू नये असे महावितरण कंपनीचे श्रीरामपूर कार्यकारी अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती परंतु महावितरण कंपनीने चितळीला लाईट जोडल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी विजपुरवठा होत आहे शेवटच्या पाण्यावर पिके आहे उन्हाळ्यात पिके जळत आहे तरी उद्या दिनांक 4/3/2026 बुधवारी सकाळी 9 वाजता वाकडी सबस्टेशन वर शेतकऱ्यांचा मौर्चा जाणार आहे तरी शेतकरी बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
या शेतकरी आंदोलनात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य शेतकरी संघटना शिवसेना तसेच सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे‌.

Post a Comment

0 Comments