(भऊरकर)यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात श्रीक्षेत्र भऊर येथून श्रीक्षेत्र पैठण कडे प्रस्थान झाले आहे.
दरवर्षी श्रीक्षेत्र भऊर येथून श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ षष्ठी यात्रे निमित्त हा पायी दिंडी सोहळा नित्यनेमाने जात असतो. यावर्षीही मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी श्रीक्षेत्र भऊर येथील श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिर येथे श्री च्या पालखी व रथाचे पूजन करून श्रीक्षेत्र पैठण कडे प्रस्थान झाले आहे. यावेळी वैजापूर पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, रावसाहेब पाटील जगताप, तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ, भजनी मंडळ, व वारकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी पूजन झाल्यानंतर या दिंडीने हातात भगव्या पताका, झेंडे तर महिलांनी डोक्यावर वृंदावन घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात राम कृष्ण हरीच्या जयघोषात मोठ्या उत्साहात प्रस्थान केले आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन मार्च ते दहा मार्च 2026 या कालावधीत हा दिंडी सोहळा आयोजित केला असून हा पायी दिंडी सोहळा 8 मार्च रोजी नारळा पैठण येथे पोहोचणार आहे. रस्त्यात तीन मार्च रोजी वराडे वस्ती, शिरसगाव, 5 मार्च रोजी साईनाथ मोरे ,पुरी ता. गंगापूर, 4 मार्च रोजी वैष्णवी ट्रेडिंग कंपनी मांजरी फाटा ,6 मार्च रोजी ज्ञानेश्वर अर्जुन भवर शेकटा ता.पैठण व सात मार्च रोजी भागचंद्र दशरथ बोबडे इसारवाडी तालुका पैठण येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर आठ ते दहा मार्च 2026 पर्यंत दिंडी विसाव्याचे ठिकाण हे अमोल भागवत वडेकर नगर ,नारळा, पैठण येथे राहणार आहे. रस्त्यात मुक्कामाच्या ठिकाणी आरती, भजन, हरिपाठ ,प्रवचन ,कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आठ मार्च रोजी नारळा पैठण येथे गोयेगाव भऊर यांचा रात्री आठ वाजता संगीतमय भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. 9 मार्च रोजी हभप संजयजी महाराज जगताप यांचे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तन होणार आहे. तर 10 मार्च रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत हभप संजयजी महाराज जगताप यांचेच काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर श्रीक्षेत्र भऊर येथील एडवोकेट प्रमोद (दादा )मुरलीधर जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्रीक्षेत्र पैठण व श्रीक्षेत्र सरला बेट अशा तीर्थस्थानी पायी दिंडीचे आयोजन होत असते. यावेळी श्रीक्षेत्र पैठण येथे या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी भाविक सहभागी झाले असून दिंडी सोहळा मजल दरमजल करत श्रीक्षेत्र पैठण कडे जात आहे. या दिंडी सोहळ्यासाठी अनेक भाविक भक्तांचे, वारकरी, तसेच अन्नदात्यांचे सहकार्य मिळत आहे.
0 Comments