टाकळीभान प्रतिनिधी :- येथील शेतकरी कुटुंबातील राहुल शिवाजी कोबरने याची नुकत्याच झालेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या जुनियर असोसिएटच्या परीक्षेमध्ये त्याने उज्वल यश मिळवले असून त्याच्या या उज्वल यशाबद्दल टाकळीभान ग्रामस्थ व राजेंद्र कोकणे मित्र मंडळ यांच्यावतीने त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. यश मिळेपर्यंत मेहनत, परिश्रम घेऊन, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्याने यशापर्यंत पोहोचता आल्याचे राहुल याने सांगितले. शेतकऱ्याचा मुलगा भारत देशातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेमध्ये चांगल्या पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांना आनंद झाला.
याप्रसंगी अशोकचे संचालक शिवाजीराव शिंदे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे, मा.प्राचार्य जयकर मगर, प्रगतशील शेतकरी काकासाहेब डिके, पाराजी पटारे,अर्जुन राऊत,आप्पासाहेब वाघुले, बापूसाहेब शिंदे, राजेंद्र कोबरने, जितेंद्र छल्लारे, बंडोपंत बोडखे,, मधुकर गायकवाड, विष्णुपंत पटारे, गटकळ,पटारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. राहुल कोबरने याचे यशाबद्दल गावातील मान्यवर, पदाधिकारी, सद्गुरु किसनगिरी बाबा भक्त मंडळ व ग्रामस्थ यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
0 Comments