कोल्हार :
पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मराठी विभागातील संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.शांताराम चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयात मराठी विभागातर्फे अनुक्रमे काव्यवाचन ,वकृत्व निबंध व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम पवार यांच्या हस्ते स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम पवार यांनी अध्यक्षीय भाषणात ,मराठी भाषेचा इतिहास व
मराठी भाषेचे महत्व सांगितले.तसेच स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आभार मराठी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र सलालकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संगीता साळवे यांनी केले.
0 Comments