टाकळीभान येथे आवतरला छञपती शिवरायांचा आश्वारुढ पुतळा, शिवजयंती उत्साहात साजरी.





टाकळीभान प्रतिनिधी :-

श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्वभागातील टाकळीभान येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे साजरी झालेल्या जयंतीच्या पुर्वसंध्येला बसस्थानक परीसरात छञपतींचा भव्य वीस फुट उंचीचा आश्वारुढ पुतळा आवतरल्याने तरुणांनी व ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोशात शिवजयंती साजरी केली. देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांच्या विधीवत पुजा करुन पुतळ्याचे जल्लोशात उद्घाटन पार पडले.
                 टाकळीभान येथे तिथी नुसार छञपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा प्रघात आहे. गेल्या काही वर्षांपासुन राजमुद्रा ग्रुपचे तरुण हा जयंती सोहळा भव्य स्वरुपात साजरा करीत आहेत. यंदाचा शिवजयंती सोहळा जरा हटके पध्दतीने साजरा करण्यात आला. बस स्थानक परीसरात छञपती शिवाजी महाराजांचा वीस फुटी आश्वारुढ पुतळा यावेळी बसवण्यात आला. छञपती संभाजीनगर येथील शिवभक्त बाळराजे आवारी यांच्या आर्थिक सहकार्यातुन यापुतळ्याची स्थापना करण्यात आली. देवगड संस्थानचे उत्तराधीकारी महंत प्रकाशानंदगीरी महाराज यांच्या हस्ते या पुरळ्याची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी मोठा जनसमुदाय भगव्या टोप्या परीधान करुन उपस्थित झाला होता. अनेक उपस्थितांना छञपतींचा भव्य पुतळा बसल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराने असमंत दुमदुमुन गेला होता.
          यावेळी मार्गदर्शन करताना महंत प्रकाशानंदगीरी महाराज म्हणाले कि, शिवरायांमुळे धर्म आजवर टिकला आहे.मंदिरे, देवालये टिकल्याने आपण आज पुजाआर्चा करतो ही छञपतींची देणगी आहे. छञपतींचे विचार आज समजुन घेण्याची वेळ आली आहे. केवळ जयंती व पुण्यतीथी साजरी करुन राजांचा विचार समाज मनात रुजणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने राजांच्या विचारावर चालण्याची सुरवात स्वतः पासुन सुरु केली पाहीजे. राजांनी आठरा पगाड जातींना सोबत घेवुन स्वराज्याची सोथापना केली हाच विचार समाजात रुजवला तर राजांच्या सस्राज्याला सुराज्य होण्यास वेळ लागणार नाही असेही महंत प्रकाशानंदगीरी महाज यावेळी म्हणाले.
         यावेळी टाकळीभान परीसरातील नागरीकांसह तरुणांनी मोठी गर्दी केली होती. आरतीनंतर सवाद्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. सायंकाळी घोगरगाव बालब्रम्हचारी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतुन छञपतींच्या चरीञावर किर्तन सेवा देण्यात आली. त्यानंतर राञी नऊ वाजता सुमारे आठ ते दहा हजार भाविकांना माहाप्रसाद देण्यात आला. राजमुद्रा गृपचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विषेश प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments