डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या वाढदिवसनिमित्त आजपासून मोफत आरोग्य शिबीर




राजुरी( वार्ताहर)
प्रवरा मेडीकल ट्रस्ट, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा रूरल हॉस्पिटल, प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस, अभिमत विद्यापीठ आणि डॉ. बाळासाहेब विखे पाटील रूरल मेडीकल कॉलेज,लोणी यांचे वतिने अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि. ८ मार्च ते २० मार्च य कालावधीत मोफत भव्य वेदना निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  
या भव्य वेदना निवारण शिबीरामध्ये मोफत विना शस्त्रक्रिया आधुनिक उपचार केले जाणार असून सकाळी दहा त सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहील. यामध्ये मणक्याचे आजार, डोकेदुखी, हाकापायाल मुंग्या येणे, कॅन्सरच्या वेदना, सांधेदुखी, चेहऱ्यावरच्या वेदना, कंबरेचे दुखणे, नागिनच्या वेदना यावर आधुनिक उपचार केले जाणार आहेत.  
 या कालावधीत तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला, मोफत रक्त तपासणी, मोफत एक्स रे तर युएसजी, सीटी स्कॅन, एमआरआय तपसण्यांमधअये २५ टक्के सुट मिळणार आहे. तरी जास्तित जास्त गरजू रूग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन भूलशास्त्र आणि अतिदक्षता विभाग प्रवरा मेडीकल ट्रस्ट यांच्या वतिने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments