(लोणी वार्ताहार- ज्ञानेश्वर साबळे ) येथील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात आपल्या कल्पकतेच्या जोरावर जिकरा इनामदार हिने सादर केलेल्या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले
आहे.जिकराने इंग्रजी व्याकरणा मधील विशेषण' ही संकल्पना अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने कशी समजून सांगता येईल, यावर आधारित एक नाविन्यपूर्ण प्रतिकृती सादर केली होती.तिच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे परीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या दिपाली गिऱ्हे-गव्हाणे यांच्या हस्ते जिकरा हिला प्रथम पारितोषिक, पदक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनाचे स्वरूप अत्यंत मोठे होते,ज्यात साधारण २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
हे प्रदर्शन मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांसाठी आयोजित करण्यात आले होते, ज्याची विभागणी गणित, विज्ञान आणि इंग्रजी अशा तीन मुख्य गटांत करण्यात आली होती.
जिकराच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या ट्रस्टी सौ.धनश्री विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील आणि सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.
0 Comments