महंत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांचा राजराजेश्वरी“रुद्राक्ष शिवमुकुट परिधान सोहळा” गुढीपाडव्याला विधिवत मोठ्या उत्साहात संपन्न!

शिर्डी (प्रतिनिधी) श्री नर्मदेश्वर सेवाधाम ,पिंपरी निर्मळ ,तालुका राहाता येथील श्री नर्मदेश्वर मंदिरामध्ये पवित्र गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभमुहूर्तावर महंत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांचा “राजराजेश्वरी रुद्राक्ष शिवमुकुट परिधान सोहळा” अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक उर्जेच्या वातावरणात विधिवत संपन्न झाला. या दिव्य सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आणि उपस्थित सर्वांच्या मनात अद्वितीय समाधान व आनंदाची अनुभूती निर्माण झाली.


या सोहळ्याच्या प्रारंभी विधीपूर्वक पूजन, मंत्रोच्चार आणि रुद्राभिषेक करण्यात आला. पवित्र वेदघोष, घंटानाद आणि हरिनामाच्या गजरात वातावरण पूर्णपणे चैतन्यमय झाले. मनीष तिवारी गुरु यांच्या पवित्र हस्ते मुख्य पूजा संपन्न झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पडले, ज्यामुळे सोहळ्याला अधिक आध्यात्मिक तेज प्राप्त झाले.या प्रसंगी ह.भ. प. मनोज महाराज बिडवे, ह भ प हरिभाऊ तात्या गुंजाळ व त्यांच्या सौभाग्यवती, तसेच योगेश पाचोरे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचबरोबर श्री नर्मदेश्वर सेवाधामचे सेवक श्री अनिल पठारे आणि चोपदार शिवा उबाळे यांनीही या सोहळ्यात सहभागी होऊन सेवा व सहकार्य केले. सर्व उपस्थित भक्तांनी अत्यंत श्रद्धेने आणि समर्पण भावनेने या दिव्य क्षणाचा अनुभव घेतला.
“राजराजेश्वरी रुद्राक्ष शिवमुकुट” परिधान हा केवळ एक विधी नसून तो देवी-देवतांच्या कृपेचे, संरक्षणाचे आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. या पवित्र सोहळ्यामुळे भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि भक्तीची वृद्धी होण्याचा संकल्प करण्यात आला. असे यावेळी महंत संन्यासी राजराजेश्वरी आत्मारामगिरीजी महाराज यांनी म्हटले.
 शिवतत्त्वाचे प्रतीक असलेला
हा मुकुट अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक भावनेतून तयार करण्यात आला असून या मुकुटाची रचना धातू तांबे व पितळ धातूपासून करण्यात आली असून त्यावर सूर्य, ॐ, स्वस्तिक, त्रिशूल आणि डमरू या शिवतत्त्वाचे प्रतीक असलेल्या चिन्हांची सुबक नक्षी करण्यात आली आहे. या चिन्हांमुळे मुकुटाला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुकुटावर 2100 पवित्र रुद्राक्ष सुशोभित करण्यात आली असून रुद्राक्ष हे भगवान शिवाचे अत्यंत प्रिय मानले जातात. याशिवाय मुकुटावर शुद्ध चांदीपासून बनवलेले “श्री” चिन्ह आणि अर्धचंद्र भगवान विराजमान करण्यात आले आहेत. “श्री” हे समृद्धी, मंगल आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, तर अर्धचंद्र भगवान शिवाच्या जटांवरील दिव्य चिन्ह म्हणून ओळखला जातो. असा हा शिव रुद्राक्ष मुकुटाचा परिधान सोहळा
गुढीपाडव्याच्या या मंगल दिवशी व नववर्षाच्या शुभारंभाला एक दिव्य आणि प्रेरणादायी दिशा देणारा ठरला. सर्वांच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक प्रगतीचा नवीन संकल्प जागृत करून हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.या कार्यक्रमाला साधक, भाविक, भक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments