राहाता तालुक्यातील एकल महिलांना मोफत अपघात विम्याची भेट



टाकळीभान प्रतिनिधी :-साऊ एकल महिला समिती, आरसीएफ, जगदंब फाउंडेशन, राहाता पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प व उमेद यांच्या वतीने राहाता तालुक्यातील एकल महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
 यानिमित्त रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. साऊ एकल समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, समन्वयक मिलिंदकुमार साळवे, अशोक कुटे, प्रतिमा कुलकर्णी, संगीता मालकर, जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंके, गटविकास अधिकारी विवेक गुंड, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी रामदास गंभीरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय घोलप, "उमेद"चे तालुका व्यवस्थापक रवींद्र खलाटे, लायन्स क्लबचे अहमदनगर डिस्ट्रिक्ट झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. लोणी येथील विमा प्रतिनिधी कैलास तळोले यांनी तालुक्यातील ५१ एकल महिलांचा मोफत अपघात विमा उतरविलेला आहे. या विम्याची कागदपत्रे सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते या महिलांना देण्यात आली.
 राहाता पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरासाठी आलेल्या एकल महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. तसेच महिलांना आरोग्यवर्धक कडधान्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसाऊ एकल महिला समितीचे राहाता तालुका समन्वयक प्रकाश जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली व सल्लागार सुरेश नळे, संदीप धीवर, नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  रोहिणी गोसावी, शितल अभंग, सुवर्णा दळे, स्वाती टोरपे, सोनाली कालेकर, अंजली साठे, मनीषा उदावंत आदींनी परिश्रम घेतले. अरूण मोकळ यांनी सूत्रसंचालन केले. नारायण जाधव यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments