टाकळीभान प्रतिनिधी:-श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक यांना कोंडून ठेवल्याने व ग्रामपंचायत च्या चाव्या घरात ठेवून कामात अडथळा तसेच ग्रामसेवक धक्का बुक्की केलेल्या कारणावरून ग्रामसेवक समीर मणियार यांच्या फिर्यादीवरून उपसरपंच पती विष्णुदास आप्पासाहेब जगताप यांच्यावर बी एन एस 132,127(2),115(2),352,351((2),351(3),112,117 प्रमाणे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,
फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी काम अटकून थोड्या उशिराने दुपारी 12 वाजता ग्रामसेवक हजर झाले त्यानंतर सायंकाळी 4 सुमारास वांगी खुर्द गावातील उपसरपंच पती विष्णुदास जगताप हा कार्यालयात आला व दोन वर्षांपूर्वी गावातील रस्त्यावर मुरूम टाकल्याचे बिल अद्याप का काढले नाही. असे मला जाब विचारत मोठ्या आवाजात अर्डा ओरडा करून शिवीगाळ करून तुम्ही येथे बसून कामकाज करायचे नाही, तुम्ही इथून निघून जा. असे म्हणत ग्रामसेवक यांना धक्काबुक्की करून खुर्चीतून खेचले व कर्मचाऱ्याकडून कुलपाची चावी काढून घेतली. ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत मध्ये कोंडून कार्यालयाच्या दरवाजा कुलूप लावून पळून गेला. त्यानंतर 112 वर पोलीस मदती साठी फोन केल्यावर गावातील काही व्यक्ती यांनी मला विचावी आणून बाहेर काढले व नंतर दुसऱ्या दिवशी देखील विष्णू जगताप यांनी कर्मचाऱ्यांच्या घरातून चावी घेऊन गेल्याचे कळाले. गावातील मध्यस्थी केलेल्या व्यक्तींनी जगताप यांच्याशी फोनवर संपर्क केला असता चावी देणार नाही, ग्रामपंचायत पेटून देईल आणि तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करीन. अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे.
0 Comments