अवकाळी पावसामुळे राहाता तालुक्यातील बऱ्याचश्या गावांना व पिकांना जोरदार फटका बसला.

राहाता (वार्ताहर )राहता शहर परिसरात गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार हजेरी लावली.गारांच्या या पावसामुळे हरभरा, गहू ,मका, चारा पिके तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे .

ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुमारे लावलेल्या या हजेरीमुळे शेतकरी बांधवांची चांगली धांदल उडाली.या अवकाळी पावसाने शेतातील गहू ,हरभरा, मका, तसेच द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान केले आहे.शहर व तालुक्यात तसेच चितळी ,वाकडी परिसरातही जोरदार गारपीटसह वादळी पाऊस झाला.या नैसर्गिक संकटामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. चितळी ,वाकडी परिसरात झालेल्या या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने व गारपिटीने मोठी हानी केली असून रब्बी हंगामातील काढणीसाठी तयार असलेला कांदा व गहू यासारख्या भुसार पिकांना मोठा फटका बसला आहे.गारपिट मुळे डाळिंब फळबागांनाही तडाखा बसला.त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडले आहे.अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी ऑटोकाट प्रयत्न केले .शेतात राबत पीके सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला .मात्र कांदा आणि गहू यासारख्या भुसार पिकांना मोठा फटका बसला असून बहार धरलेल्या डाळिंब फळबागांनाही गारपिटीचा मोठा तडाखा बसला.या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे 

चौकट 
वाकडी, चितळी परिसरात प्रचंड वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसामुळे गहू, हरभरा ,मका व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पिके भुईसपाट झाली आहे..शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावून घेतला गेला आहे.तरी शासनाच्या कृषी विभागाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा

 विठ्ठलराव शेळके , 
अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना.

Post a Comment

0 Comments