श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था यांच्या वतीने श्री रामनवमी उत्सव २०२६ निमित्त पायी पदयात्रा करणाऱ्या साईभक्तांसाठी विविध पालखी थांब्यांवर कीर्तन व प्रवचन सेवेचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश भाविकांना आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देणे तसेच प्रवासादरम्यान भक्तीमय वातावरण निर्माण करणे हा आहे.
या अनुषंगाने दि. १९ मार्च ते दि. २४ मार्च २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत कीर्तन/प्रवचन सेवा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये दि. २१ मार्च रोजी ह.भ.प. सोमेश्वर गतीर यांची किर्तनसेवा घाटनदेवी मंडपव्यवस्था येथे संपन्न होईल.
दि. २२ मार्च रोजी ह.भ.प. गणेश मुसमाडे यांचे किर्तन घाटनदेवी मंडपव्यवस्था, ह.भ.प. विकास गायकवाड यांचे किर्तन पांढुर्ली येथील संस्थान पालखी थांबा तर मुसळगाव (सिन्नर) येथिल पालखी थांब्यावर ह.भ.प. प्रसाद कानडे यांचे किर्तन होणार आहे.
दि. २३ मार्च रोजी पांढुर्ली येथील संस्थान पालखी थांबा येथे ह.भ.प. धर्मराज उपाडे, मुसळगाव (सिन्नर) येथिल पालखी थांब्यावर ह.भ.प. ज्ञानेश्वर गायकवाड, खोपडी – महामार्ग भक्तनिवास पालखीथांबा ह.भ.प.किसन म.काकड, पांगरी येथील संस्थानचे पालखी थांबा येथे ह.भ.प.उल्हास वाळुंजकर, वावी मारुती मंदिरामागील मंडपव्यवस्थेत ह.भ.प.बाळासाहेब जोशी, मालढोण फाटा येथील मंडपव्यवस्थेत ह.भ.प.अमोल गाडे, श्री साईसेवा पालखी निवारा बहादूरपूर येथे गोरक्ष नलगे, विधी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान तर को-हाळे येथील श्री साईमंदिर येथे सायंकाळी ०७ ते ०९ यावेळेत ह.भ.प.सौ.आशाताई गोंदकर यांचे किर्तन / प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
दि.२४ मार्च रोजी खोपडी महामार्ग भक्तनिवास पालखी थांबा येथे ह.भ.प.उत्तम गाढे, पांगरी येथील संस्थानचे पालखी थांबा येथे ह.भ.प.नंदा वर्पे, वावी मारुती मंदिरामागील मंडप व्यवस्थेत ह.भ.प.कैलास कुंजीर, पाथरे हायवे थांबा येथील हॉटेल वनराई मंडपव्यवस्था येथे ह.भ.प.विकास यादव तर को-हाळे येथील श्री साईमंदिर येथे सायंकाळी ०७ ते ०९ यावेळेत ह.भ.प.कृष्णा अदमाने यांचे किर्तन / प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच श्री साईबाबा संस्थानमार्फत साईसेवक मंडळ, मुंबई व साईलीला मंडळ, मुंबई यांच्या पालखी थांब्याच्या ठिकाणी विविध कीर्तन, प्रवचन व पोवाडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१/०३/२०२६ या दिवशी नाशिक येथील सत्यम मंगल कार्यालयात ह.भ.प. अचला महाराज वाघ यांचे किर्तन होणार आहे, तर पंचवटी येथील श्रद्धा लॉन्स येथे श्री साईबाबा संस्थानच्या प्रचार-प्रसार समितीमार्फत श्री किशोर सासवडे यांचा पोवाडा सादर केला जाणार आहे. दि. २२/०३/२०२६ रोजी सिन्नर येथील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे ह.भ.प. राहुल महाराज डुंबरे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले असून शिंदेगाव येथील कृष्णा लॉन्स येथे ह.भ.प. बाळासाहेब राजाराम जोशी मार्गदर्शन करणार आहेत. दि. २३/०३/२०२६ रोजी वावी येथील भक्तनिवास येथे संस्थानच्या प्रचार-प्रसार समितीमार्फत कार्यक्रम होणार असून खोपडी येथील साई आश्रमात ह.भ.प. सागर महाराज टिपरे यांचे किर्तन पार पडणार आहे. दि. २४/०३/२०२६ रोजी निघोज व निमगाव परिसरात रात्री ८ ते ९ या वेळेत श्री साईबाबा संस्थानच्या प्रचार-प्रसार समितीमार्फत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमुळे पायी येणाऱ्या साईभक्तांना प्रवासादरम्यान आध्यात्मिक मार्गदर्शन व भक्तीमय वातावरणाचा लाभ मिळणार आहे.
0 Comments