गडकरी राजकुमार
या नवरात्र साधनेचे वैशिष्ट्यम्हणजे या नवरात्रकालावधीत येथील आश्रमात एक दिव्य आणि शांततामय वातावरण निर्माण होते. संपूर्ण परिसरात मंत्रोच्चार, भजन आणि साधनेचा निनाद सतत घुमत असतो. या काळात प्रमुखतः खालील साधना आणि धार्मिक उपक्रम केले जातात.नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून श्री नर्मदेश्वर सेवा धाम पिंपरी निर्मळ तालुका राहाता येथील आश्रमात असणाऱ्या पवित्र होमकुंडात अखंड धुना प्रज्वलित केली जाते. ही धुना म्हणजे साधनेची ऊर्जा आणि तपशक्तीचे प्रतीक मानली जाते. धुनीसमोर ध्यान, जप आणि नामस्मरण सतत सुरू असते. तसेच अखंड दीप प्रज्वलन करण्यात आला असून नवरात्रभर एक अखंड दीप प्रज्वलित ठेवला जातो, जो आदिशक्तीच्या अखंड उपस्थितीचे प्रतीक आहे. हा दीप साधकांच्या अंतःकरणात ज्ञान आणि प्रकाश जागविण्याचे कार्य करतो. तसेच या नवरात्रीमध्ये महंत संन्याशी राजराजेश्वरी आत्मारामगिरी महाराज स्वतः अत्यंत कठोर उपवास पाळतात. या उपवासात सात्त्विक आहार, मौन, जप आणि ध्यान यांचा समावेश असतो. शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी साधण्यासाठी हा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.नवरात्रातील प्रत्येक दिवस हा नवदुर्गेच्या एका स्वरूपाला समर्पित असतो. त्या अनुषंगाने दररोज वेगवेगळ्या देवीचे पूजन, मंत्रजप आणि ध्यान केले जाते. यामुळे साधकाला शक्ती, भक्ती आणि आत्मज्ञानाची अनुभूती प्राप्त होते. वर्षभरात येणाऱ्या चैत्र आषाढ शर्दीय आणि माघी या चार नवरात्रांचे आध्यात्मिक महत्त्वही मोठे आहे.
संन्यासी आत्मारामगिरी महाराज वर्षभर या चार नवरात्रांचे पालन करतात, ज्यामध्ये प्रत्येक नवरात्राचे स्वतंत्र महत्त्व आहे. याबाबत संन्याशी राजराजेश्वरी, रुद्राक्ष शिवमुकुटधारी महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी सांगितले की,
चैत्र नवरात्र ही नवचैतन्य, नवीन आरंभ आणि आध्यात्मिक उर्जेचा उदय देणारी असते.तर
आषाढी नवरात्र ही अंतर्मुखता आणि साधनेतील स्थिरता देते.
शारदीय नवरात्र ही शक्तीपूजा आणि विजयाची साधना देणारी ठरते. त्याचप्रमाणे
माघी नवरात्र ही तपश्चर्या आणि आत्मशुद्धी करणाऱ्या कालावधीसाठी महत्त्वाची असते.या पवित्र साधना सोहळ्यात अनेक भक्त, शिष्य आणि साधक सहभागी होत आहेत. ते उपवास, जप, सेवा आणि सत्संगाद्वारे या दिव्य साधनेत सहभागी होतात. सध्या सुरू असलेल्या या चैत्र नवरात्री कालावधीत श्री नर्मदेश्वर सेवा धाम आश्रमात दररोज आरती, भजन आणि प्रवचनांचे आयोजन केले जात असून ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती व मार्गदर्शन मिळत आहे. असे म्हणतात आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले. चैत्र नवरात्री साधना सोहळा हा केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, साधना आणि शक्ती उपासनेचा एक महान आध्यात्मिक उत्सव आहे. अखंड धुना, दीप प्रज्वलन, कठोर उपवास आणि नवदुर्गा साधना यांच्या माध्यमातून साधकांना आत्मिक उन्नतीचा मार्ग सापडतो.ही साधना केवळ वैयक्तिक नव्हे, तर समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण करणारी ठरत असून, सनातन धर्माच्या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याचे महान कार्य या माध्यमातून घडत आहे. असेही संन्याशी राजराजेश्वरी, रुद्राक्ष शिवमुकुटधारी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
0 Comments