सुरेश ठोके
आज शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी राहता तालुक्यात येणाऱ्या लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक ,लोणी खुर्द तसेच कोल्हार बुद्रुक गावातील नागरिकांच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी या गावांमध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला आहे.
या प्रकल्पांतर्गत लोणी गावातील वीस चौकांमध्ये एकूण 88 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत तर कोल्हार गावातील आठ चौकांमध्ये एकूण 33 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सदर उद्घाटन सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी पाटबंधारे राज्यमंत्री अण्णासाहेब म्हस्के, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्राचे दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लोणी पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस आधिकारी ,कर्मचारी तसेच लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार ,भगवतीपुर ,प्रवरानगर, परिसरातील नागरिकही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गावांमध्ये चौकात चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यामुळे या गावातील रहिवासी, नागरिकांमधून विशेषता महिलांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments