लोणी येथे जगदंब फाउंडेशन मार्फत राज्यस्तरीय भव्य आधुनिक 'मराठा वधू-वर परिचय मेळावा संपन्न




लोणी (प्रतिनिधी):
जगदंब फाउंडेशन संचलित आणि महाराष्ट्रातील नंबर १ ची विश्वसनीय वधू-वर सूचक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'मराठा सोयरीक संस्था' यांच्या वतीने मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी भव्य १०६ व्या मोफत मराठा वधू-वर परिचय मेळावा लोणी खुर्द येथील वरद विनायक सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे.
या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटन मा. ना. सौ. शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा (अ.नगर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 या कार्यक्रमासाठी वरद विनायक देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. श्री. उद्धव महाराज मंडलिक , जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष श्री गणेश शिवाजी लंघे व मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक कुटे तसेच जगदंब फाउंडेशनच्या संचालिका सौ जयश्री ताई कुटे, जगदंब फाउंडेशन चे तालुका समन्वयक श्री प्रकाश जोंधळे श्री. संदीप बाबासाहेब गावडे(ग्रीन लीफ ऍग्रो), श्री. माणिक शिवराम धनवटे(धनवटे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स) तसेच के के एंटरप्राइजेस चे संचालक कमलेश कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या मेळाव्यासाठी विवाह इच्छुक मोठ्या प्रमाणात वधू-वरांनी सहभाग घेतला.उपस्थित विवाह इच्छुक वधू-वरांना मा. सौ शालिनीताई विखे पाटील आणि श्री अशोक कुटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
 या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जगदंब फाउंडेशनचे तालुका समन्वयक श्री. प्रकाश जोंधळे, व्यवस्थापक श्री. सचिन निर्मळ, श्री. संदीप बाबासाहेब गावडे, श्री. माणिक शिवराम धनवटे , श्री नारायण जाधव , श्री सुरेश नळे, श्री संदीप धिवर, श्री सर्जेराव घोडके, श्री बाळू सूर्यवंशी, श्री अनिल घोलप, श्री गोकुळ शिंदे श्री उदय तारळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अनिल घोलप यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री नारायण जाधव सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments