श्री साई एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे कार्य कौतुकास्पद--सौ धनश्रीताई विखे पा.सभासदांसाठी दहा लाखाचा विमा तसेच सोसायटीच्या स्वमालकीच्या इमारतीचा प्रश्नही मार्गी लावणार--- चेअरमन विठ्ठल पवार

शिर्डी ( प्रतिनिधी)-शिर्डी येथील श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही संस्थेच्या सभासदांच्या दृष्टिकोनातून नेहमीच विविध उपक्रम राबवित असून या सोसायटीचे कार्य कौतुकास्पद व गौरव करण्यासारखे आहे .असे गौरवउद्गगार रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्री सुजयदादा विखे पा. यांनी काढले. 

शिर्डी येथील साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोसायटीच्या वतीने सर्व सभासदांना नुकताच शीधा वाटप शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे ,बी.बी दाभाडे ,रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय शिंदे ,या सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष अभय शेळके म्हणाले की, या सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व सर्व संचालक मंडळांनी सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर या संस्थेत मोठे परिवर्तन करून सोसायटीच्या माध्यमातून विविध धोरणात्मक व चांगले निर्णय घेऊन ही संस्था आणखी नावारूपाला व प्रगतीपथावर आणली असून ही प्रगती समाधान देणारी ठरत आहे. असे सांगितले तर सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार म्हणाले की, या सोसायटीमध्ये सत्तेवर येताच सर्व संचालक तसेच सभासद यांच्या सहकार्यातून या संस्थेने विविध धोरणात्मक निर्णय घेतले असून संस्था प्रगती पथावर आणण्याचे काम ना. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय दादा विखे पाटील तसेच संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थांचे तदर्थ समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सोसायटीच्या सभासदांचा दहा लाख रुपयाचा अपघाती व नैसर्गिक मृत्यू विमा उतरवण्यात आला आहे. सध्या ही सोसायटी स्वतःच्या इमारतीत नाही ही खंत आहे. या सोसायटीची इमारत तांत्रिक वादात आहे. तरी या स्वमालकीच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला या सोसायटीचे संचालक महादू कांदळकर ,कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे ,संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते , मिलिंद दुनबळे, तुळशीराम पवार ,रवींद्र गायकवाड ,भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, सौ सुनंदा जगताप ,सौ लता बारसे, रंभाजी गागरे ,भाऊसाहेब लबडे, तसेच सचिव विलास वाणी ,सहसचिव बाबासाहेब अनर्थे ,सहा. सहसचिव संभाजी सोपान कोते आदींसह सोसायटीचे सभासद, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments