अंधश्रद्धेतुन झाडांना खिळे ठोकनेचा गैरप्रकार,सारोळा येथील दर्गा परिसरातील झाडे झाली खिळे व वेदना मुक्त--



दिलीप शिंदे 
 सोयगाव दि.१७ - अंगात येणे, करणी, भानामती व इतर अंध विश्वासाने सैलानी येथील झाडांना खिळे ठोकनेचा प्रकार सर्व श्रुत असून अलीकडील काही वर्षांपासून सारोळा (पीर ) येथे ही दर्गा परिसरात ५ ते ६ झाडांना खिळे ठोकनेचा ( खुट मारणे ) प्रकार सुरु आहे.या विषयाची माहिती सिल्लोड येथील वृक्ष संवर्धक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे गतीविधीचे जिल्हा सह कार्यवाह डॉ. संतोष पाटील यांना मिळाल्यावर त्यांनी आज तिथे जाऊन त्या सर्व झाडांचे खिळे काढून त्या खोल जखमात बायो -कीड नाशक व वॅक्स भरले.

 खिळे ठोकल्यानें झाडांना ही वेदना होतात व ती कीड लागून कोसळतात.वनविभागाच्या महाराष्ट्र ट्री फेलिंग ऍक्ट १९६४ नुसार झाडांना कोणत्याही स्वरूपाची इजा / दुखापत करणे गुन्हा आहे.    

                          -- वृक्ष देवो भव-- आपल्या हिंदू धर्म संस्कृती मध्ये वृक्षांना दैवत मानले जाते. त्यांना ही भावना असतात. धर्मात झाडांना खिळे ठोकणे ची कसलीही प्रथा, रीत नाही. भाविकांनी या गोष्टी अनुसरू नये.जो झाडांचे रक्षण करतो,झाडे त्याचे रक्षण करतात. - 
                               बालयोगी जगन्नाथगीरी महाराज, गहिनीनाथ आश्रम, सारोळा (नाथाचे )

Post a Comment

0 Comments