टाकळीभान प्रतिनिधी-: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे अखिल भारतीय श्रीकृष्ण गोपाळ समाज संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी गावातील साईबाबा मंदिर येथे बैठकी मध्ये नुकत्याच पार पडल्या.
यामध्ये टाकळीभान गोपाळ संघटनेच्या अध्यक्षपदी शहादेव ब्राह्मणे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच तालुकाध्यक्षपदी विठ्ठल जाधव, जिल्हा क्रीडा अध्यक्षपदी पंकज जाधव यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समस्त गोपाळ संघटना तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला व निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी गोपाळ समाज बांधवांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन नूतन पदाधिकाऱ्यांनी केले.
याप्रसंगी भाऊसाहेब गव्हाणे, सुभाष ब्राह्मणे, एकनाथ सावंत, संजय सावंत, कानिफनाथ जाधव, अनिल लोणारे,विशाल ब्राह्मणे, रोहन लोणारे, किरण ब्राह्मणे, गणेश सावंत, राजू सावंत, एकनाथ पवार, बाबासाहेब सावंत, दादासाहेब सावंत, आकाश लोणारे, दीपक सावंत, शिवनाथ पवार आदीसह समस्त गोपाळ समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments