परिक्रमेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी मोफत थंड पेय व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. उन्हाच्या झळा आणि चालण्यामुळे थकलेल्या भाविकांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला.
हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.या सेवा उपक्रमाप्रसंगी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते तसेच संचालक महादू कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते, मिलिंद दुनबळे, तुळशीराम पवार, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे ,इकबाल तांबोळी, सौ सुनंदा जगताप,सौ.लता बारसे, रंभाजी गागरे, भाऊसाहेब लबडे, सचिव विलास वाणी, तसेच बाबासाहेब अनर्थे ,संभाजी कोते आदींसह कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी स्वतः उपस्थित राहून व्यवस्थेची पाहणी केली आणि भाविकांशी संवाद साधला.यावेळी बोलताना चेअरमन विठ्ठल पवार म्हणाले,“साईभक्तांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी समाधानाची गोष्ट आहे.”
पुढे माहिती देताना चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले की,
“साई परिक्रमा हे वर्षातील ३६५ दिवस सुरू असणारे अखंड व्रत आहे. तीन सहा पाच यांची बेरीज 14 होते. 14 किलोमीटरची ही परिक्रमा आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या प्रत्येक ‘साई प्रसाद’ स्टॉलवर साई परिक्रमेचे विशेष स्टिकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे स्टिकर साईभक्तांना वर्षभर मोफत दिले जाणार आहेत.” तसेच वाहनांवरही हे स्टिकर यापूर्वी लावण्यात आले होते. असे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले. या उपक्रमाचे परिक्रमा वासियांकडून मोठे कौतुक होत आहे.
0 Comments