मंहत संन्यासी आत्मारामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 15 फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी आठ वाजता श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरामध्ये श्री शिवजींचा अभिषेक मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या व साधक मंडळींच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच सकाळी नऊ ते 12 या वेळेत शिव भजन व वारकरी भजन होणार असून वैजापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक तसेच पानगव्हाण, पिंपरी निर्मळ, सावळी विहीर ,अस्तगाव, व इतर ठिकाणचे भजनी मंडळ यावेळी उपस्थित राहणार आहे. तसेच दुपारी बारा ते एक या वेळेत महाशिवरात्री निमित्त भाविकांना फराळाचा महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे .दुपारी एक ते तीन या वेळेत हभप सावंत अण्णा यांचे हरिकीर्तन होणार असून त्यासाठी विणेकरी हभप राजूभाऊ पवार ,मृदंगाचार्य अर्जुन महाराज इंगळे ,गायनाचार्य हभप रतन महाराज इंगळे ,मच्छिंद्र नाना इंगळे ,ह भ प ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल हरणे ,हभप हरिभाऊ गुंजाळ, ह भ प प्रकाश तात्या पोपट तात्या ,ह भ प सुदाम देवा, ह भ प मच्छिंद्र इंगळे, किशोर मामा अहिरे तसेच चोपदार म्हणून शिवा उबाळे( सरला बेट) हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन ते चार या वेळेत मंहत आत्मारामगिरीजी महाराज व ह भ प कोलते सर यांच्या मार्गदर्शनाने येथिल महाशिवरात्री सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व साधक, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरीजी ट्रस्ट, पिंपरी निर्मळ तालुका राहाता यांच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.
0 Comments